Header Ads Widget

 


करमाळा-
      सिद्धार्थनगर-मौलालीमाळ प्रभागातून राजू आव्हाड यांना उमेदवारी मिळावी. अशी मागणी येथील हिरालाल पवार सर व सहकाऱ्यांनी यांनी केली आहे. शहराच्या विकासाचे व्हिजन असणारे राजू आव्हाड हेच योग्य उमेदवार आहेत. कारण करमाळा नगरपालिकेत अगोदर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. राणीताई आव्हाड या नगरसेविका प्रभाग 1 मधून होत्या. त्याचबरोबर त्या बांधकाम समिती सभापती देखील होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भरपूर कामे केलेले आहेत. स्वतः गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांना गरिबीची जाण असून, नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी कटिबद्ध असतात.

       पवार पुढे बोलताना म्हणाले कि, गेली पंधरा वर्षांपासून राजू आव्हाड त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. राणीताई आव्हाड व राजू आव्हाड हे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यामुळे या निवडणुकीत  निवडून आल्यास ते प्रभागातील प्रमुख समस्यांवर तातडीने तोडगा नक्कीच काढतील. अशा प्रकारचा आशावाद पवार यांनी व्यक्त केला आहे. तरी आव्हाड हे निश्चित करत असलेल्या जाहीरनाम्यातील  विकासकामे व योजना शहरातील नागरिकांना दीर्घकालीन फायदा देणाऱ्या असल्यामुळे नागरिक देखील त्यांच्या जाहीरनाम्यातील आकर्षित होतील. अशाप्रकारचा विश्वास शेवटी पवार यांनी व्यक्त केला आहे.




Post a Comment