महाराष्ट्रतील महार वतनी, इनामी, गायरान जमीनी प्रस्थापित धनदाडग्यांनी बेकायदेशीररित्या बळकावल्या आहेत. राज्यात सुमारे साडेपाच लाख एकर जमिनी ह्या महार वतनी जमीनी असुन या जमिनीना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज तसेच ब्रिटीश काळात शौर्य गाजवलेल्या महार समाजातील लोकांना उदरनिर्वाहासाठी बक्षीस म्हणून 'देण्यात आल्या होत्या. परंतु बहुतांश ठिकाणी शिक्षण सम्राट, साखर सम्राट आदी गब्बरगंड लोकांना त्या जमीनी बेकायदेशीररित्या हाडप करून, त्या ठिकाणी मोठ-मोठे उद्योगधंदे व शैक्षणिक संस्था उभारल्या आहेत. त्यामळे गावखेड्यात राहणाऱ्या महार समाजावर उपासमारीची वेळ येऊन तो उदरनिर्वाहासाठी भटकंती करत आहे.
या प्रकरणाची शासनाने जिल्हानिहाय समिती निर्माण करून प्रत्येक जिल्हा, तालुका व गावनिहाय महार वतनी जमीनी शोधून, त्या जमिनींचे जाहिर प्रसिध्दीकरण करून त्या मुळ मालकांना (पुर्वआश्रमीचे महार व आत्ताचे बौध्द) यांना परत मिळाव्यात. व ज्या जमिनीवर धनदांडग्या लोकांनी बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून वहिवाट करीत आहेत. या लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात यावेत. ही प्रमुख मागणी आहे. तरी या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची र्नोद घ्यावी.
अशा प्रकारचे निवेदन करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना भीम आर्मीच्या वतीने देण्यात आले आहे.






Post a Comment