दहिगाव-शेटफळ शिवारात झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील ओढ्यांना, मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणचे पूल वाहून गेल्यामुळे लोखंडे वस्ती परिसरात राहणाऱ्या 200 पेक्षा जास्त लोकांचा, दहीगाव-शेटफळ या दोन्ही बाजूकडून संपर्क तुटल्याने, या परिसरातील लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करण्याची वेळ येत आहे. तालुक्यातील दहिगाव लोखंडे वस्ती भागामध्ये दहिगाव व शेटफळ या दोन्ही गावातील साधारणपणे, 200 ते 250 लोकसंख्या असलेली लोकवस्ती आहे. या ठिकाणी दहीगाव येथील शेळके वस्ती वरून जाणारा एक रस्ता आहे. तर शेटफळ गावापासून लबडे वस्ती कडून जाणारा एक रस्ता आहे. या दोन्ही रस्त्यावर मोठे ओढे असून, गेल्या वर्षी लोकवर्गणीतून या परिसरातील लोकांनी या दोन्ही ठिकाणी स्वतः सिमेंट पाईप आणून पूल बनवले होते. या दोन्ही ठिकाणचे पूल पावसाने वाहून गेल्याने, या परिसराचा काही काळ संपर्क तुटला होता. जेसीबीच्या मदतीने शेटफळ वरून तात्पुरता रस्ता चालू झाला असला, तरी या दोन्ही ठिकाणच्या ओढ्यावर सिमेंट पूल बांधून रस्ता सुरळीत करण्याची मागणी परिसरातील आप्पासाहेब लोखंडे, बापूराव लोखंडे, सागर टकले, तुकाराम मासाळ, नामदेव वाघमोडे, विजय लबडे, सुधीर पोळ, गणेश नाईकनवरे, नानासाहेब साळूंके, पुरूषोत्तम पोळ, दादासाहेब सलगर या लोकांमधून केली जात आहे.
आम्ही दहीगाव शेटफळ गावातील लोखंडे वस्ती परिसरातील लोक अनेक दिवसापासून या दोन्ही ओढ्यावर फुलाची मागणी करत आहोत परंतु याकडे दुर्लक्ष होत असून आम्हाला दरवर्षी अनेक अडचणीचा सामना करण्याची वेळ येत आहे या दोन्ही ठिकाणी सिमेंट पूल उभा केल्यानंतरच या लोकांचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे
तुकाराम मासाळ, ग्रामस्थ दहिगाव
शेटफळ दहीगाव परिसरात झालेल्या पावसाने या परिसरातील ओढ्यावरील पुल वाहून गेले आहेत या परिसरात शेतात निर्यातक्षम केळी व फळबागा आहेत हा शेतमाल बाजारात पेटीकडे पाठवण्यासाठी रस्त्याचे अडचण शेतकऱ्यांना होत असून तातडीने पुलाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
नानासाहेब साळूंके ग्रामस्थ शेटफळ






Post a Comment