Header Ads Widget

 


करमाळा-
         जेऊर शिवसेनेच्या वतीने आषाढी वारीनिमित्त पंढरीला जाणार्‍या वारकऱ्यांसाठी, मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप तसेच अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. करमाळा येथून वारकरी पायी चालत पुढे जेऊर या ठिकाणी विसावा घेतात. या अनुषंगाने त्यांचा थकवा दुर होऊन त्यांना आराम मिळावा, तसेच त्यांना योग्य तो उपचार मिळावा. यासाठी जेऊर येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सदरचा स्तुत्य उपक्रम घेतला असल्याचे ओबीसी व्हिजेएनटी जिल्हाध्यक्ष सुयश कर्चे यांनी सांगितले. 

           यावेळी पुढे बोलताना कर्चे म्हणाले कि, आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हिरक महोत्सव वर्ष साजरा करत आहोत. आमचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी असे सामाजिक उपक्रम राबवत असतो. आमच्या सदरच्या उपक्रमाचा जेऊर शहरातुन पंढरीकडे पायी प्रवास करणाऱ्या हजारो वारकरी माऊलींना लाभ मिळाला. आम्ही समाजाच्या हितासाठी काम करत असताना, पक्षाचे विचार, कार्य तळागाळात पोहचवणे हाच उद्देश ठेवून आम्ही सतत काम करणार आहोत. पंढरीकडे जाणाऱ्या एका वारकऱ्याला अचानक भोवळ आल्यानंतर, त्यांना लगेच जेऊर येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार केले. त्यांच्या आरोग्याची स्थिती पाहता त्यांना आम्ही घरी जाण्याची विनंती केली असता, त्यांना विठ्ठलाच्या भेटीची ओढ असल्याने ते पुढे पंढरपूरकडे रवाना झाले. 

              यावेळी शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी जिल्हाध्यक्ष सुयश कर्चे, महिला जिल्हा प्रमुख श्रीमती पद्मजाताई इंगवले -जगताप, तालुका संपर्क प्रमुख निलेश पोटे, तालुका अध्यक्ष रमेश लगस, युवासेना तालुका अध्यक्ष नवनाथ गुंड, उपजिल्हा अध्यक्ष श्रीकांत गोसावी, तालुका उपाध्यक्ष शहाजी बोराडे, सचिव माधव सूर्यवंशी, उपतालुका प्रमुख बापूसाहेब जाधव, तालुका उपाध्यक्ष दादा थोरात, शेलगाव शाखा प्रमुख भाऊसाहेब टकले, डॉक्टर कारंडे, दादा काळे, नितीन निमगिरे, संतोष पंडित, काका निमगिरे, दादा कर्चे, बंडू निमगिरे, संकेत मुटेकर, आदित्य लोंढे आदी शिवसैनिक तसेच तालुक्यातील महिला पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment