Header Ads Widget

 


करमाळा-
           करमाळा शहरालगत असलेल्या जिद्द करिअर अकॅडमीच्या माध्यमातून दरवर्षी अनेक विद्यार्थी पोलीस भरती, आर्मी, नेव्ही तसेच इतर हि क्षेत्रात उज्वल यश संपादन करत आहेत. या अनुषंगाने यावर्षी देखील येथील अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सदरची यशाची परंपरा कायम ठेवली आहे. याच यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, अकॅडमीच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. सदरच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यासाठी, करमाळा पोलीस स्टेशनच्या API गिरिजा मस्के मॅडम, राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा सरचिटणीस संतोष वारे, तालुकाध्यक्ष अमरजित साळूंखे, मुकुंद साळूंखे सर, पत्रकार सिद्धार्थ वाघमारे, पत्रकार दिनेश मडके, चांदणे सर, विशाल शिंदे सर इ. मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. 

         कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांचा, उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला. यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे 1) इरफान पठाण (मुंबई पोलीस) 2) अमर देवरे (इंडियन आर्मी) 3) विजय गाडे (इंडियन आर्मी) 4) गणेश भुजबळ (इंडियन आर्मी) 5) विजय कांबळे (इंडियन आर्मी) 6) राजेश गोरे (इंडियन आर्मी) 7) खंडू माळी (इंडियन आर्मी) 8) संघर्ष उबाळे (इंडियन आर्मी) 9) निखिल घोडके (आसाम रायफल) इ. विद्यार्थ्यांनी कठिण परिश्रम घेऊन यशाला गवसणी घातली आहे. 

          या सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन तसेच वेळोवेळी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी, येथील प्रशिक्षक पुरेपुर मेहनत घेऊन गावखेड्यातून आलेल्या मुलांना वेगवेगळ्या भरतींमधील नेमके अचूक मार्गदर्शन करत असल्यामुळे, या अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाचा टक्का वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे जिद्द करिअर अकॅडमीच्या शिक्षकांनी देखील, विद्यार्थ्यांनी पुढील भरती परीक्षांमध्ये मोठे यश संपादन करण्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटी ठेवावी अशा प्रकारचे आवाहन केले आहे.



Post a Comment