Header Ads Widget

 


करमाळा-
      निलज गावातील पूरग्रस्त शेतकरी-कुटुंबियांना शेती उपकरणे व साहित्य देऊन, आई कमलाभवानी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, करमाळा यांनी या हंगामातील शेतीसाठी आवश्यक असलेले स्टार्टर, पॅनल बॉक्स, कटाऊट, फिटिंग पट्टी इत्यादी साहित्य वाटप केले. संस्थेच्या करमाळा येथील कार्यालयात या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा पोलिस ठाण्याचे एपीआय टिळेकर, डॉ. रोहन पाटील, अण्णासाहेब सुपनवर, तात्यासाहेब जाधव उपस्थित होते.

         कार्यक्रमाच्या सुरुवातीला निलज गावकऱ्यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष यांनी संस्थेची उद्दिष्टे सांगून, संस्थेने आतापर्यंत अनेक सामाजिक कामे केली असुन, भविष्यकाळात देखील गरजवंतांसाठी संस्था सदैव मदतीसाठी उभा राहणार असल्याचे आश्वासन दिले. सदरचा सामाजिक उपक्रम संस्थेचे सचिव अभिजित पाटील, अजिंक्य पाटील व सहसचिव तात्यासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न केला गेला.

        अध्यक्षीय मनोगतात दशरथआण्णा कांबळे यांनी म्हटले की, ही संस्था दानशूर व्यक्तिमत्त्व स्व. डॉ. प्रदीपकुमार जाधव (आबा) पाटील यांचा वारसा सांभाळत आहे. आबांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉ. रोहन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरची संस्था कार्यरत आहे. अशाप्रकारचे मनोगत कांबळे यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश गायकवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन संतोष वाळूंजकर यांनी मांडले. कार्यक्रमासाठी अर्बन बँकेचे व्यवस्थापक व संचालक एस.पी. कांबळे तसेच निलज गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment