Header Ads Widget

 


करमाळा-          
         करमाळा नगरपालिका निवडणुक बर्‍याच वर्षांपासून रखडली गेली होती. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार भावी उमेदवार म्हणून जनतेत सातत्याने जात होते. या अनुषंगाने करमाळा नगरपालिकेच्या मा. नगरसेविका सौ. सविता जयकुमार कांबळे या देखील सातत्याने जनतेशी संपर्क ठेवून, त्यांच्या अडीअडचणी समजून घेत होत्या. त्यामुळे जनतेतून देखील त्यांच्या नावाची नेहमीच चर्चा होताना दिसून आली आहे. सौ. सविता कांबळे यांचे पती जयकुमार कांबळे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने समाजकारणात अग्रेसर राहिलेले आहेत. मौलाली माळ येथील जिल्हा परिषदेची शाळा दरवर्षी दत्तक घेऊन, येथील विद्यार्थ्यांना ते शैक्षणिक साहित्य देतात. उपेक्षित घटकाच्या मदतीसाठी देखील त्यांचा पुढाकार नेहमीच असतो. कोरोना काळात देखील स्वखर्चाने अनेकांसाठी ते काही प्रमाणात का असेना, भोजनाची व्यवस्था करत होते. शहरातील विविध समस्यांबाबत करमाळा नगरपालिकेत प्रशासक असताना देखील, वेळोवेळी पाठपुरावा करुन समस्या सोडवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये रस्ते, गटारी, पाणी, शौचालय यासाठी सातत्याने त्यांनी पाठपुरावा करुन या समस्या सोडविल्या आहेत. 

                  सौ. सविता जयकुमार कांबळे यांनी करमाळा नगरपालिकेत बागल गटाच्या नगरसेविका म्हणून काम करत असताना, नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या कामाला प्राधान्य दिलेले आहे. गेल्या बर्‍याच वर्षांपासून करमाळा नगरपालिकेवर, शासनाकडून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. अशा स्थितीत देखील जनसामान्यांपर्यंत नेहमीच सौ. कांबळे यांनी जनसंपर्क ठेवलेला आहे. त्यामुळे येत्या काळात देखील सौ. कांबळे यांनी निवडणूक लढवावी. अशा प्रकारची विनंती प्रभाग क्रमांक 7 व 10 येथील नागरिकांनी सौ. कांबळे यांच्याकडे केलेली आहे. 1 नोव्हेंबर रोजी जयकुमार कांबळे यांच्या संपन्न झालेल्या वाढदिवसानिमित्त आलेल्या नागरिकांनी सौ. कांबळे यांची भेट घेऊन निवडणुकीसाठी सज्ज रहावे. अशा प्रकारचा आशावाद संबंधित नागरिकांनी व्यक्त केला आहे. 

          मी सन्माननीय आमच्या नेत्या रश्मी दिदी बागल तसेच युवा नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली काम करते. नागरिकांनी व्यक्त केलेली अपेक्षा नक्कीच आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवू. तरी या निवडणुकीत नागरिकांच्या भावनांचा विचार करुन, बागल गटाच्या वरिष्ठांनी आम्हाला जर निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश दिले. तर परत एकदा जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही नक्कीच तत्पर राहू. 

सौ. सविता जयकुमार कांबळे, मा.नगरसेविका करमाळा नगरपालिका


Post a Comment