करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता विद्यानगर करमाळा येथे संपन्न होतील. अशी माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघ संचालिका रश्मी बागल यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना रश्मी बागल म्हणाल्या की, करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, यासंदर्भात भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत. या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवारी दुपारी 1 वा. करमाळा विद्यानगर येथे, तर सकाळी अकरा वाजता कुर्डुवाडी येथे संपन्न होतील.
सदरच्या मुलाखती घेण्यासाठी पक्षनिरीक्षक म्हणून अक्कलकोट तालुक्याचे विद्यमान विधानसभा सदस्य आ. सचिन कल्याणशेट्टी, तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार हे उपस्थित राहणार आहेत. तरी इच्छुकांनी रविवारी दुपारी 1 वाजता विद्यानगर येथे वेळेवर उपस्थित रहावे. तसेच ज्या महिला इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी स्वतः मुलाखतीसाठी उपस्थित राहावे अन्य प्रतिनिधीस पाठवू नये. असे आवाहन भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी केले.
करमाळा नगरपरिषद निवडणूक भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकतीनिशी लढवणार असून, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतला सक्षम भारत, सुदृढ, स्वच्छ भारत देश घडवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, करमाळा नगरपरिषद निवडणुकीत सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने, व जनतेच्या आशीर्वादावर निश्चितपणे आम्ही घवघवीत यश संपादन करू. असा विश्वास शेवटी महिला प्रदेश भाजपा उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी व्यक्त केला.






Post a Comment