करमाळा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच सुरु झालेल्या टर्फ ग्राऊंडवर भव्य खुल्या टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा 25 व 26 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धा सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहेत. या स्पर्धांसाठी प्रथम पारितोषिक तब्बल 21000 रु. तर द्वितीय पारितोषिक 11000 रु. आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 1500 रु. प्रवेश फि आकारण्यात येणार आहे. तर या स्पर्धेत 5-5 षटकांचे सामने होणार असुन, डे-नाईट अशाप्रकारे हे सामने खेळविले जाणार आहेत.
या सामन्यांमध्ये प्रत्येक संघात फक्त सात खेळाडूंची मर्यादा असणार आहे. त्याचप्रमाणे LBW हा नियम लागू राहणार नाही. तसेच प्रत्येक सामन्याला स्पीडलिमीट असणार आहे. वरील काही बाबी वगळून टर्फ क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या प्रत्येक सामन्याला इतर सर्व नियम लागू असणार आहेत. टर्फ क्रिकेट ग्राऊंडवरील सर्व सामन्यांचे युट्यूब चॅनेलवरून थेट प्रक्षेपण होणार असुन, करमाळा तालुका तसेच महाराष्ट्रातील क्रिडा रसिकांना येथील सर्व सामन्यांचा एकाच ठिकाणाहून पुरेपुर आनंद घेता येणार आहे.
नाव नोंदणीसाठी श्रेयश गोसावी मो. 9325784260, सौरभ चव्हाण मो. 7030735651, अनिकेत वारे मो. 8600301384, वैभव जगदाळे मो.9322568384 या नंबरवर संपर्क करुन, आपल्या संघाची नावनोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.






Post a Comment