करमाळा-
शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या मुद्द्यावरून, करमाळा तालुक्यातील सोगावचे सरपंच विशाल विश्वनाथ सरडे यांना अपात्र करावे. या मागणीसाठी मनोज दत्तात्रय घनवट यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायत अधिनियम 14 ज 3 खाली अर्ज दाखल केला होता. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासमोर त्यांचा न्याय निवाडा होऊन, सरपंच विशाल सरडे यांचे सरपंच पद व सदस्य पद कायम राहिल्याचे आदेश, महसूल विभागाचे विद्यमान उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख साहेब यांनी काढले आहेत. सरपंच विशाल सरडे यांच्या बाजूने एडवोकेट पांडुरंग माने यांनी युक्तिवाद केला. सोगाव ग्रामपंचायतचे सरपंच विशाल सरडे हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत. या निकालामुळे सोगाव गावामध्ये सरपंच विशाल सरडे यांच्या समर्थकांमध्ये आनंद व उत्सव साजरा करण्यात आला.






Post a Comment