Header Ads Widget

 


करमाळा-
          मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तथा मराठा समन्वयक सचिन काळे यांनी पुणे येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. व त्यांना सोलापूर येथील जात पडताळणी ऑफिसमध्ये सर्वच समाजातील लोकांना किती त्रास दिला जातो हे सांगितले. यावेळी सपकाळ म्हणाले कि, हा प्रश्न फक्त मराठा समाजाचाच नसून, जात व्हेरिफिकेशन सर्वच जातींसाठी आहे. त्यामुळे मी हा विषय गांभीर्याने घेऊन सोलापूर येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पाठपुरावा करण्यास सांगेन. व त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊन स्वतः यामध्ये लक्ष घालेन असे त्यांनी आश्वासन दिले.

           त्याचप्रमाणे सपकाळ पुढे बोलताना म्हणाले कि, करमाळा तालुक्यामध्ये जात पडताळणी ऑफिस संदर्भामध्ये आंदोलन झाले होते. त्यावेळी सुद्धा काही जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, अशा प्रकारची मला माहिती मिळालेली आहे. याबाबतीत काळे यांनी सांगितले कि, स्थानिक प्रशासन सहकार्य करत आहे. तर शेळके यांनी थेट अधिकाऱ्यांवर आरोप करत सांगितले कि, आता शासनाचा अधिकाऱ्यांवर दबाव व अंकुश राहिलेला नाही. हे सुद्धा सर्वांनी समजून घेतले पाहिजे. जनतेला जर विविध कार्यालयांमध्ये त्रास होत असेल तर, जन आंदोलन उभा करावे लागेल. आम्ही पूर्ण ताकदीनिशी निश्चितच तुमच्या पाठीशी उभा आहोत. अशा प्रकारचे आश्वासन शेळके यांनी दिले. यावेळी सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीरभाई सय्यद, डॉ. अमोल दुरंदे, ॲड. सविताताई शिंदे इ. प्रमुख मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment