Header Ads Widget

 


करमाळा-
            महाराष्ट्र राज्याचे गृह व महसूल राज्यमंत्री योगेश कदम सोमवारी करमाळा दौऱ्यावर येणार असून, या दिवशी विविध शासकीय आढावा बैठका व पक्ष बैठकांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना चिवटे यांनी सांगितले की, शिवसेनेचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे प्रमुख उपस्थितीत महसूल, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाची विविध विषयावर आढावा बैठक तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता धर्मसंगीत मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेली आहे. 

         त्यानंतर एक वाजता रंभापूरा येथे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या शुभहस्ते व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली, माजी नगराध्यक्ष वैभव जगताप यांचे उपस्थितीत शिवसेना शाखेचे उद्घाटन व त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी नगराध्यक्ष वैभव जगताप यांचे प्रमुख उपस्थितीत विविध संस्थांच्या व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची, बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, तालुकाप्रमुख अनिल पाटील, शहर प्रमुख संजय शीलवंत, युवासेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे, करमाळा तालुका समन्वयक राहुल कानगुडे यांनी दिली.

       शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा विचार घरा-घरात पोहोचण्यासाठी मी पूर्ण ताकतीने रणांगणात उतरलो असून, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या साक्षीने निवडणुकीचा बिगुल वाजवणार आहे. असे यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सांगितले.

मा.आ. जयवंतराव जगताप 



Post a Comment