कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक नामदेवराव जगताप यांचा विचार पुढे घेऊन जाणारे, जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यांच्याबरोबर मी सुद्धा शिवसेनेत आता सक्रिय झालो असून, येणाऱ्या काळात करमाळा तालुक्यातील सर्व 118 गावात तथा शहरातील 20 विभागात शिवसेनेच्या मजबूत, व प्रामाणिक शिवसैनिकांच्या शाखा काढून संघटना मजबूत करणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराचा वारसा घेऊन तालुक्यातील व शहरातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणार! असा संकल्प मा. नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी व्यक्त केला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्ताने ठाणे येथील त्यांच्या शक्ती स्थळाला भेट देऊन धर्मवीर दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेतले, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, शिवसेना व्यापारी आघाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब बलदोटा, शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.
करमाळा शहरातील नगरपालिका निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर स्वतंत्रपणे लढवणार असून, यावेळी वाॅर्ड रचनेचा आढावा वैभव जगताप यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री यांना दिला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन, करमाळा शहरात नवरात्रीत युवक मेळाव्यासाठी करमाळ्याला येण्याचे देखील आमंत्रण देण्यात आले. मा. नगराध्यक्ष वैभव जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश करून खऱ्या अर्थाने राजकारणाची दिशा निश्चित केली असून, तालुक्यातील व शहरातील सर्व मुस्लिम समाज मा.आ. जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे यांचे विचार तळागाळात पोहोचविणार असल्याचे नगरसेवक अहमद चाचा कुरेशी यांनी सांगितले.






Post a Comment