सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणे 24 तास अहोरात्र सर्वसामान्यांसाठी काम करणारे, एकमेव संवेदनशील नेतृत्व एकनाथ शिंदे असून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. असे मत मातोश्री वृद्धाश्रमचे अध्यक्ष बाळासाहेब गोरे यांनी व्यक्त केले. मौलाली माळ करमाळा येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या, सर्वसामान्य नागरिकांसाठी मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. अजय शिंदे यांच्या पुढाकाराने, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने एकनाथ आरोग्य हिरक वर्षानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन अंधारे हॉस्पिटल बार्शीचे समन्वयक डॉ. बारस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब गोरे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, तालुका समन्वय राहुल कानगुडे, तालुकाप्रमुख अनिल पाटील, शहरप्रमुख संजय शीलवंत, धर्मवीर वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख अण्णासाहेब घाडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे, वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक नागेश चेंडगे पाटील, जेऊर शहर प्रमुख माधव सूर्यवंशी, शिवसेना ओबीसी सेनेचे तालुकाप्रमुख अंकुशराव जाधव, उपतालुकाप्रमुख गौतम रोडे, कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब वाघ, पत्रकार नासिर कबीर आधी जण उपस्थित होते.
या शिबिराला शिवसेनेची युवा नेते मार्केट कमिटीचे संचालक शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. अंधारे हॉस्पिटल बार्शी, उपजिल्हा रुग्णालय करमाळा, तालुका वैद्यकीय अधिकारी करमाळा, मातोश्री नर्सिंग कॉलेज करमाळा येथील डॉक्टर व आरोग्य सेवकांनी 350 रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात ईसीजी तपासणी, शुगर ब्लड, ब्लड प्रेशर तपासणी व इतर सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी करण्यात आली. यावेळी रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज आहे. त्यांना अंधारे हॉस्पिटल येथे मोफत ऑपरेशन करण्याची नोंदणी करण्यात आली.
एक रिक्षा चालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, ही गोष्ट सर्वसामान्यांसाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात सर्वात सक्षम व संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची नोंद झाली आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक सर्वसामान्य जनतेला, लाडक्या बहिणींना, तळागाळातील कष्टकरी मजूर, शेतकरी अशा प्रत्येक घटकाला पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हवेत. अशी सर्वांची इच्छा आहे व इच्छा लवकरच पूर्ण होईल. असा आशावाद बाळासाहेब गोरे यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे करूनच महायुतीने जिंकली होती. एकनाथ शिंदे पुुन्हा मुख्यमंत्री होणार! यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला मतदान केले. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा आहेत. यामुळेच बहुमताने सत्ता आली मात्र सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आले. परंतू जनतेच्या मनात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असून, भावी काळात नक्कीच पुन्हा शिंदे मुख्यमंत्री होतील. असा विश्वास जिल्हाप्रमुख चिवटे यांनी शेवटी व्यक्त केला.







Post a Comment