शुक्रवार 15 ऑगस्ट 2025 रोजी करमाळा कमलाभवानी मंदिराच्या पायथ्याशी, अथर्व मंगल कार्यालय येथे, शिवरायांच्या वंशजांच्या शुभहस्ते छत्रपती शासन ग्रुपचा राज्यस्तरीय वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. अशी माहिती छत्रपती शासन ग्रुपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजयकुमार राजेघोरपडे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब तनपुरे यांनी दिली. या कार्यक्रमाची सुरुवातीला मर्दाणी खेळ, दांडपट्टा, तलवारबाजीचे प्रात्याक्षिके केम येथील व करमाळा येथील प्रशिक्षण संस्थांनी केली. यावेळी शिक्षण खात्याचे मा. आमदार दत्तात्रय सावंत यांचे शुभहस्ते श्रीफळ फोडून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्याचप्रमाणे विचारमंचावर जिजाऊ माँसाहेब यांचे वंशज लखोजी राजेजाधव यांचे वंशज श्रीमंत शिवाजीराजे जाधव, छत्रपती शंभुराजे यांचे वंशज नितीनराजे राजेभोसले, सरदार शेलार मामा यांचे वंशज राहुल शेलार, हंबीरराव मोहिते यांचे वंशज राजेंद्र मोहिते, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे, गणोजी शिर्के यांचे वंशज हृतिक शिर्के इ. प्रमुख पाहुुण्यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली होती. या सर्व वंशजांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन सर्वांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक, सामाजिक कार्य, आरोग्य, खेळ अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्थानच्या वतीने प्रमाणपत्र, छत्रपती शासनमुद्रा प्रदान करून करून करण्यात आला. महाराष्ट्रात असणारे किल्ले त्यांची योग्य निगा, महाराजांचा पुरातन ठेवा पुढील पिढीसमोर आदर्श र प्रेरणादायी राहिला पाहिजे. यासाठी याचे जतन व संवर्धन होणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन छत्रपती शासन ग्रुप, हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राणजित गवंडी यांनी केले. याप्रसंगी शंभुराजे जगताप, सचिन काळे, प्रा गोवर्धन चवरे सर, नर्मदेश्वर महाराज संगोबा व उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्थान (भारत) ची स्थापना 15 ऑगस्ट 2019 झाली. प्रथम 495 गड किल्ले, पुरातन मंदिरे, राजवाडे यांची अविरत 3760 कार्यकर्ते घेऊन गेेेली सहा वर्षांपासुन साफ-सफाई करण्याची मोहिम हाती घेतलेली आहे. आतापर्यंत ग्रुपच्या माध्यमातून कोरोना काळात गोर-गरीबांसाठी नव्वद हजार अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले होते. महाराष्ट्रात सतरा हजार वृक्षारोपण करण्यात आली आहेत. आतापर्यंत सहा वर्षाच्या काळात पाचशे पंधरा वेळेस रक्तदान शिबिर आयोजित करून, दोन हजार सत्तावीस गरजूंना मोफत रक्त पुरवठा केलेला आहे. पुरग्रस्तांना किराणा, कपडे, इतर साहित्य वाटप केलेेेेेले आहे. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्थानच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.






Post a Comment