Header Ads Widget

 


करमाळा-
        करमाळा तालुक्यातील सततच्या पडणाऱ्या संततधार पावसामुळे, त्याचप्रमाणे काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे आघाताची पिके मका, उडीद, कांदा वाया गेली आहेत. काही ठिकाणी केळीच्या बागेचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिराऊन घेतला गेला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आर्थिक व माणसिक दृष्टीने खचला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी. 

         यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा.तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे- पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. यावेळी कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले कि, मी देखील मुळचा शेतकरी कुटूंबातील असल्यामुळे, शेतकर्‍यांच्या अडचणी मी जाणतो. कोणत्या हि शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही. व लवकरात-लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी, आपण सकारात्मक असल्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. असल्याची महिती मांढरे- पाटील यांनी दिली आहे.



Post a Comment