Header Ads Widget

 


करमाळा-
        2004 ते 2009, 2009 ते 2014 व 2014 ते 2019 या कार्यकाळात तालुक्यात 3 वेगवेगळे आमदार होते. या कालावधीत तालुक्याचा वीज प्रश्न सोडविण्यासाठी किती नवीन सबस्टेशन मंजूर झाली? किती सबस्टेशनच्या क्षमतेत वाढ झाली? याची माहिती घ्या व 2019 ते 2024 या कालावधीत किती सबस्टेशन व किती सबस्टेशनची क्षमता वाढ झाली याची तुलना व अभ्यास करून विचार करा. आपण जात किंवा भावनेवरती मत मागत नसून, आपण विकास कामांच्या जोरावरती मतं मागत असतो. आणि त्यामुळेच 2019 ते 2024 या कालावधीत आपण तालुक्यातील वीज प्रश्न सोडविण्यासाठी 3 नवीन सबस्टेशन व जवळपास 15 सबस्टेशनची क्षमतावाढ करून घेतली. त्यामुळे वीज प्रश्न सुटण्यामध्ये आपल्याला यश मिळाल्याचा मनस्वी आनंद होत असून, इथून पुढे ही आपल्याकडे आमदारकी नसली तरी विकास कामे सुरूच राहणार, तुम्ही निश्चित रहा असे प्रतिपादन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी राजुरी येथील 33 /11KVA सबस्टेशनच्या लोकार्पण प्रसंगी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे होते.

              यावेळी नंदकुमार जगताप, आर. आर. साखरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने संजयमामा शिंदे यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला व त्यांचे आभार व्यक्त केले. अध्यक्षीय मार्गदर्शन बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केले. यावेळी जेष्ठ नेते वामन बदे, ॲड. नितीनराजे भोसले, सतीश शेळके, जिल्हा दूध संघाचे संचालक अशोक पाटील, चिखलठाण गावचे माजी सरपंच चंद्रकांत सरडे, जि.प. चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, वाशिंबे गावचे सरपंच तानाजी झोळ, युवा नेते अजिंक्य पाटील, उध्दव माळी, डॉ.गोरख गुळवे, भरत खाटमोडे, निळकंठ अभंग साहेब, युवा नेते आण्णासाहेब पवार, राजेंद्र बाबर, अशोक तकीक, अनिल शेजाळ, अनिल केकान, सचिन गावडे,मा.शंकर कवडे,मा.उदय पाटील, पै.उमेश इंगळे, बापू तांबे, स्वप्निल पाडूळे, नंदकुमार जगताप साहेब, आर.आर.बापू साखरे, संजय साखरे, भाऊसाहेब साखरे, उदय साखरे, नवनाथ दुरंदे, आत्माराम दुरंदे, आप्पा निरगुडे, धनंजय जाधव, संजय साखरे, सुनिल पाटील, नवनाथ साखरे, आप्पा टापरे, वसंत भोईटे, दादा साखरे, संदिपान साखरे, आबा साखरे, दत्तू बोबडे, डॉ.फाळके, विठ्ठल देशमुख, प्रविण साखरे व ग्रामस्थ उपस्थित होते.



Post a Comment