करमाळा-
करमाळा तालुका व शहरातील मराठी गणपती मुर्ती कारखानदार व विक्रेते यांची, परप्रांतीय गणपती मुर्ती कारखानदार यांच्या विरोधात, करमाळा मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांच्या कडे निवेदन दिले आहे. परप्रांतीयांमुळे स्थानिक मराठी कारखानदार विक्रेते अडचणीत येणार असुन, लाखो रूपये खर्च करून कर्ज काढुन कारखाने उभा केले. परंतू परप्रांतीय रस्त्यावर अतिक्रमणाच्या जागेत पाल ठोकून हलक्या प्रतीच्या साहित्याचा वापर करून गणपती तयार करतात. यामुळे करमाळा तालुक्यात व शहरात मराठी गणपती मुर्ती कारखानदार व विक्रेते याांना कारखानदारी बंद करावी लागेल कि काय? अशा प्रकारची वेळ येईल अशी भिती मराठी कारखानदार यांनी, मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांच्याकडे व्यक्त केली आहे. व या सर्व प्रकारावर वेळीच मार्ग काढावा. अशा प्रकारचे निवेदन दिले आहे.






Post a Comment