Header Ads Widget

 


करमाळा-
        सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा येथील उपविभागीय लिपिक पदी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ  सोलापूर, यांनी कर्मचारी नियुक्त केलेला असताना कार्यकारी अभियंता अकलूज, यांनी सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती अतिरिक्त कार्यभार वेतन या कनिष्ठ लिपिकाने सांभाळायच्या पदावर केली आहे. वास्तविक वरिष्ठ लिपिकाकडून कनिष्ठ लिपिक पदाचे काम कार्यकारी अभियंता हे करून घेत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा हे उपविभागीय लिपिक पदाच्या कर्मचाऱ्यांवाचून पोरका आहे. व त्यामुळे कामाचा मोठया प्रमाणावर खोळंबा होत आहे.

        कार्यकारी अभियंत्यांच्या मनमानी कारभारामुळे करमाळ्याला कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. याबाबत शिवसेना जिल्हाध्यक्ष व्हिजेएनटी/ओबीसी सुयश कर्चे यांनी, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापूर यांच्याकडे वस्तुस्थितीचा पाठपुरावा करून, अकलूज येथे दोन वरिष्ठ लिपिक दर्जाचे कर्मचारी उपलब्ध करून घेतले. तरी सुद्धा कार्यकारी अभियंता करमाळा येथील उपविभागीय लिपिक यांना, करमाळा सार्वजनिक बांधकाम विभाग येथे सोडण्यास तयार नाहीत. सदर वरिष्ठ लिपिकाच्या कामकाजाबाबत बऱ्याचशा तक्रारी यापूर्वी आल्या आहेत. तरी सुद्धा कार्यकारी अभियंता अकलूज हे सदर कर्मचाऱ्याला अकलूज येथून सोडण्यास तयार नाहीत.

        मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पारदर्शक शासकीय कामाच्या धोरणाला कार्यकारी अभियंता अकलूज यांच्याकडून केराची टोपली दाखवण्यात येत असून, मनमानी कारभार करून करमाळ्यातील सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय करून त्यांना वेठीस धरण्यात येत आहे. अशा प्रकारे सुयश कर्चे यांनी सांगितले आहे.



Post a Comment