करमाळा तालुक्यातील मंत्रालयामध्ये कामकाज करणारे अधिकारी यांचा स्नेहमेळावा, मुंबईमध्ये आयोजित करणे व सर्वांना एकत्रित आणणे हा कौतुकास्पद उपक्रम आहे. असे प्रतिपादन कक्ष अधिकारी अजय साखरे यांनी मांडले. करमाळा तालुक्यातील मंत्रालय-विधानभवन येथे कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांचा शुक्रवार दि. २० जून रोजी सचिवालय जिमखाना, मुंबई येथे स्नेहभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. मंंत्रालयीन पातळीवरील अनुभवाचा आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत-जास्त उपयोग व्हावा. अशी अपेक्षा कार्यक्रमाचे संयोजक दीपक चव्हाण यांनी व्यक्त केली.
आपल्या माध्यमातून गाव तसेच तालुक्यातील सामाजिक काम करण्यासाठी आपण यातून पुढाकार घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन कक्ष अधिकारी संदीप कदम यांनी केले. यावेळी सदानंद मोहिते, सुरेखा तळेकर, महेश जाधव, विजय जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांच्या संकल्पनेमधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपसचिव शाहजान मुलाणी, मंगेश चिवटे, विनोद गाडे, प्रशांत दौंड, आकाश कांबळे, अक्षय हांडे, राम नलवडे, महेश मोरे, संतोष कांबळे, दत्तात्रय शिरस्कर, प्रवीण पोळ, कल्याणी साळुंखे, रोहित मेहेर, सुजित सावंत, अक्षय शिंदे, संदीप कदम, शैलेश कानडे, दाऊद शेख, मीनाक्षी जाधव, कल्याणी देवकर, निखिल शिंदे, किशोर साळवे, गोपाळ वाघमारे यांच्यासह इतर ही मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश जगताप यांनी केले. सूत्रसंचालन चैतन्य नलवडे यांनी केले तर आभार गणेश घाडगे यांनी मानले.





Post a Comment