वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने करमाळा येथील उद्योजक संतोष कुलकर्णी यांना, वसुनंदिनी उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये निर्भीडपणे कार्यक्षमतेने काम करणाऱ्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, शिक्षण, पत्रकारिता, उद्योग व्यवसाय, इंजिनिअर, वकील, पोलीस, सैनिक या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी गौरव करण्यात येत असतो. करमाळा तालुक्यामध्ये अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था या संघटनेच्या माध्यमातून संतोष कुलकर्णी हे काम करत असून, भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष म्हणून ही ते कार्यरत आहेत. कुलकर्णी यांनी क्लासिक ऑइल कंपनीच्या नावाने महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यामध्ये देखील कंपनीच्या माध्यमातून नावलौकिक मिळवला आहे. कुलकर्णी यांच्या कार्याची दखल वसुनंदिनी फाउंडेशनने घेतली असून, या पुरस्कारामुळे कुलकर्णी यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
संतोष कुलकर्णी यांना वसुनंदिनी फाउंडेशनचा उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, करमाळा तालुक्यातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.





Post a Comment