Header Ads Widget

 


करमाळा-
        निंभोरे येथील आदर्श सरपंच रवि वळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसोबत, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थितांकडून महापुरुषांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

       यावेळी सरपंच रवि वळेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत, काही ऐतिहासिक गोष्टींना उजाळा दिला. तसेच बाबासाहेब यांच्या आयुष्यातील काही महत्वाचे प्रसंग सांगितले. यावेळी उपसरपंच प्रतिनिधी संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य अण्णा सावंत, समाधान वळेकर, दत्ताभाऊ वळेकर, प्रविण वळेकर, ईश्वर मस्के, सोमा गुरव, नारायण गायकवाड, भगवान गायकवाड, प्रल्हाद गवळी, नितीन गायकवाड, बबलू कळसाईत, सत्यवान खाडे, युवराज गवळी, सुनिल धेंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नितीन गायकवाड, संदीप कळसाईत, सत्यवान खाडे, सुनिल धेंडे यांनी प्रयत्न केले.


Post a Comment