Header Ads Widget

 


करमाळा-
          जिंती गावातील दलित वस्ती भीमनगर येथे गेले चार दिवसांपासून लाईटचा ड्रम जळाला आहे. सद्या जिंती गावात पूर्णपणे विजेचा पुरवठा आहे, परंतू फक्त दलित वस्ती येथेच लाईट नाही. त्यामुळे चार दिवसांपासून नागरिक, जनावरे यांचे पाण्यावाचून प्रचंड हाल होत आहेत. दररोज लागणारे दळण, पाणी तसेच रात्रीची वीज नसल्यामुळे, मच्छरांचा येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व बाबींमुळे लहान मुले आजारी पडत आहेत, या संदर्भात भीमनगर येथील नागरिकांनी ग्रामपंचायत व महावितरण यांच्याशी चर्चा केली. परंतू या ठिकाणच्या समस्यांकडे राजकीय सुडापोटी जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत.
            या सर्व प्रकाराबाबत चार-पाच दिवस होऊन गेले, तरी ग्रामपंचायत व महावितरणचे कर्मचारी दुर्लक्ष करत असल्यामुळे, भीमनगर येथील नागरिकांनी श्रीमंत नितीन राजे भोसले यांच्या समोर त्यांची समस्या मांडल्यावर, राजे भोसले यांनी सदरच्या प्रकाराविषयी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधून,  भीमनगर येथील समस्या लवकरात-लवकर सोडविण्याची सुचना देखील केली होती. परंतू महावितरणचे कर्मचारी गावातीलच असल्यामुळे, राजकीय सुड उगवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारचा आरोप श्रीमंत नितीन राजे भोसले यांनी केला आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदरच्या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन, जिंती गावातील भीमनगर येथील समस्या लवकरात-लवकर सोडवून वीजेचा पुरवठा पुर्ववत करावा. व जिंती गावातील भीमनगर येथील वीजेचा पुरवठा सूड व द्वेष भावनेने बंद करणाऱ्या वायरमनची हकालपट्टी करावी. अशी मागणी श्रीमंत नितीन राजे भोसले यांच्यासह येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Post a Comment