Header Ads Widget

 


करमाळा-
          करमाळा, परंडा, जामखेड या तीन तालुक्यातील जवळपास 250 ते 350 गावातील नागरिक जेऊर स्थानकावरून प्रवास करतात. दौंड, कुर्डूवाडी, पुणे, सोलापूर या शहरांच्या ठिकाणी जाणे व येण्यासाठी 'हुतात्मा इंटरसिटी' ही गाडी अत्यंत सोयीची आहे. ही गाडी सोलापूर - पुणे - सोलापूर अशी 264 किमी. अंतर धावते. ही गाडी माढा व जेऊर स्थानकावरून सकाळी पुण्याच्या दिशेने जाताना व संध्याकाळी माघारी येताना, दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सोयीची आहे. सदरच्या गाडीला या दोन्ही स्थानकावर थांबा मंजूर झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांची दळणवळणाच्या दृष्टिकोनातून मोठी सोय होणार आहे. पुणे येथे शालेय शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे खाजगी व सरकारी कर्मचारी यांना कामावर जाणे- येणे साठी, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली व आधुनिक आरोग्य सेवा घेण्यासाठी, मोठ्या दवाखान्यांमधील उपचारासाठी, छोटे-मोठे व्यापारी आपला व्यवसाय करण्यासाठी, खरेदी विक्रीसाठी या गाडीचा उपयोग सकाळी व संध्याकाळी या गाडीचा उपयोग होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करुन या गाडीला जेऊर व माढा स्थानकावर थांबा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे प्रवासी संघटना व ग्रामीण भागातील नागरिकांकडून 'हुतात्मा इंटरसिटी' या गाडीच्या थांब्याची मागणी करण्यात येत आहे.

        या सर्व बाबींचा विचार करून 'हुतात्मा इंटरसिटी' या गाडीचा थांबा मंजूर करण्यात यावा. म्हणून सोलापूर विभाग रेल्वे सल्लागार समितीचे अध्यक्ष संजय पाटील तसेच प्रवासी असोसिएशन जेऊरचे अध्यक्ष सुहास सुर्यवंशी, असोसिएशनचे सचिव प्रमोद जानकर यांच्या वतीने सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक जे.एन.गुप्ता, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक सुदर्शन देशपांडे यांना भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व संबंधित अधिकारी यांनी सांगितले की, आम्ही लवकरात लवकर या गाडीच्या थांब्याबाबत प्रस्ताव तयार करून, वरिष्ठ कार्यालयाकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात येईल.


Post a Comment