Header Ads Widget

 


करमाळा-
              प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत ज्या कुटुंबाला आजपर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. अशा गरजू लाभार्थ्यांनी 31 मे 2025 पर्यंत आपल्या ग्रामपंचायत ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सर्व्हेक्षण करून घ्यावे. किंवा स्वतः आवास प्लस 2024 सर्व्हेक्षण या ॲप द्वारे सर्व्हेक्षण करून घ्यावे. असे आवाहन पंचायत समिती माजी सदस्य व श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. राहुल सावंत यांनी केले. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांनी, आपल्या गावातील सर्व्हे पारदर्शक करून जास्तीत-जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होईल यासाठी प्रयत्नशील रहावे. आणि आपल्या गावातील एक ही लाभार्थी यापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी.

       प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलाच्या लाभासाठी ग्रामीण भागात बेघर, कच्च्या घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबाचे आवास प्लस 2025 सर्व्हेक्षण करमाळा तालुक्यात सुरू आहे. या सर्व्हेसाठी शासनाने पुन्हा 31 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमार्फत किंवा स्वतः आवास प्लस 2024 सर्व्हेक्षण या ॲप द्वारे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. या सर्व्हेक्षणासाठी 31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  जे कुटुंब अद्याप ही सर्व्हेक्षण पासून वंचित आहेत त्यांनी सर्व्हेक्षण  करून घेण्यात यावे. कोणत्याही लाभार्थ्याला अडचण आली तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन ॲड. राहुल सावंत यांनी केले आहे.



Post a Comment