Header Ads Widget

 


करमाळा- (सिद्धार्थ वाघमारे)
          करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, अन् लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात परत एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले. बागल गट, जगताप गट, पाटील गट, शिंदे गट व आता नव्याने तालुक्याच्या राजकारणात पाय रोवू पाहणारा झोळ गट, सध्या आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. परंतू सध्याच्या निवडणूकीतून बागल गट व जगताप यांनी माघार घेतल्याचे जाहिर केल्यामुळे, निवडणूक हि पाटील, शिंदे व झोळ गटातच होणार हे जवळपास निश्चित होत आले आहे. जगताप व बागल गटाने निवडणूकीतून माघार घेतल्यानंतर 1 एप्रिल रोजी 272 उमेदवारी अर्जामधून फक्त दोन्ही गटाच्या एकुण 22 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर 2 एप्रिल हा अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे, उर्वरित 250 उमेदवारी अर्जापैकी किती जण माघार घेणार? हे पाहणे गरजेचे असणार आहे. 

          काल (दि. 1 एप्रिल) रोजी उर्वरित तीन गटाचे कार्यकर्ते व उमेदवारांच्या महत्वाच्या विविध ठिकाणी बैठका झाल्या आहेत. कोणते प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात शड्डू ठोकणार? व कोणत्या उमेदवारांना माघार घ्यायची आहे याची संपुर्ण तयारी झाली कि नाही? याचे आज पुर्णत: चित्र स्पष्ट होणार आहे. यामध्ये जगताप व बागल गटाच्या प्रमुखांनी आव्हान केल्यानंतर सुद्धा किती उमेदवार आदेश पाळणार? व किती उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार? हे पाहणे सुद्धा तितकेच महत्वाचे ठरणार आहे. याच अनुषंगाने प्रा. रामदास झोळ सर व मा.आ. संजयमामा शिंदे यांची देखील आदिनाथ कारखाना निवडणूकी संदर्भात भेट होऊन महत्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजत आहे. त्याचप्रमाणे निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेतलेल्या गटांचे, वरिष्ठांच्या अंतर्गत आदेशानुसार काही उमेदवारी अर्ज राहतील का? तसेच प्रा. झोळ व मा.आ. शिंदे यांच्या चर्चेतून काही प्रमाणात वेगळे राजकीय चित्र पहायला मिळेल का? 

         करमाळा तालुक्यात शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथआण्णा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने पाय रोवू पाहत असलेल्या प्रा. झोळ यांच्या गटाकडे ही सदरच्या निवडणूकीत एक चांगला प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जाणार आहे. तर झोळ गटाला राजकीय स्थिरता प्राप्त करुन देण्यासाठी, व कारखान्याच्या निवडणुकीचा दांडगा अनुभव असणारे कांबळे कोणती? व कशाप्रकारची रणनिती आखणार? हे सुद्धा पहावे लागणार आहे.


Post a Comment