Header Ads Widget

 


करमाळा- (सिद्धार्थ वाघमारे)
       हंगाम २०२४-२५ मधील हमीभावाने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मुदत वाढीची मागणी विचारात घेता, सदर मुदत दिनांक ३० एप्रिल, २०२५ पर्यंत वाढविण्यात येत आहे. तरी याबाबतचे पत्र संगिता शेळके अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी सहीने आदेशित केले आहे. तरी राज्यस्तरीय नोडल एजन्सी, गतिशील कृषिकल्याण फेडरेशन, शासकीय हमीभाव खरेदी PSS-2024-25 नाफेड अंतर्गत तूर, हरभरा खरेदी अंतर्गत सीना कृषी शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी  ता. करमाळा या कंपनीच्या वतीने तूर खरेदी सध्या चालू आहे याचा लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा. तसेच शेतकर्‍यांसाठी खालील कागदपत्रे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. 

1. 2024-25 यावर्षी पिकांची ई-पिक नोंदणी तलाठी हस्तलिखित असलेला 7/12 व 8 अ उतारा

2. आधार कार्ई झेरॉक्स प्रत

3. राष्ट्रीयकृत बँक खाते पासबूक झेरॉक्स प्रत

            इ. कागदपत्रे घेऊन कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतीत काही अडचण आल्यास मो.नं. 9881650983, 9851983983 या नंबरवर शेतकर्‍यांनी संपर्क साधावा. अशा प्रकारे कंपनीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment