दि. 22 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामोणे, येथे जागतिक वन दिन व जल दिन साजरा करण्यात आला. जागतिक वन दिन व जल दिनाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. साळुंखे मॅडम माळढोक पक्षी अभयारण्य करमाळा, यांचे मार्गदर्शनानुसार वीटचे वनपाल दोंड, वनरक्षक कामोणे येथील प्रदीप शिंदे तसेच वनरक्षक गाडे व कदम यांचे उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमामध्ये वनांचे महत्त्व व प्राण्यांची अन्नसाखळी यांचा असणारा घनिष्ठ संबंध, तसेच वाढते तापमान व मानवी जीवनावर होणारा परिणाम, प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम याविषयी सखोल असे शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पर्यावरणाचे रक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येकी पाच झाडे लावून हातभार लावावा. व आपले पर्यावरण समृद्ध करून सर्व सजीव सृष्टीसाठी मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी प्रत्येकाला वृक्ष लागवडीविषयी प्रोत्साहित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक गभाले सर व सर्व शिक्षक वृंद तसेच ग्रामीण परिसर विकास समितीचे अध्यक्ष विठ्ठल नलवडे यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.




Post a Comment