कुंभारगाव ग्रामपंचायत येथे दि. 28 मार्च रोजी दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या वतीने राखीव पाच टक्के निधीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक शेरे भाऊसाहेब, सरपंच सौ. सुनीता रामदास पोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार दिव्यांग सेलचे सोलापूर जिल्हाध्यक्ष जाफरभाई इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार दिव्यांग सेल, करमाळा तालुका अध्यक्ष चिमाजी शिवाजी पानसरे, कुंभारगाव ग्रामपंचायत सदस्य मारुती कुंभार यांच्या उपस्थितीत दिव्यांगाना 5% निधीच्या धनादेशाच्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
जिल्हाध्यक्ष इनामदार व तालुकाध्यक्ष, चिमाजी पानसरे यांनी तालुक्यातील इतर ही ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटला जातो का नाही. याचा देखील पाठपुरावा करून, दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार अशाप्रकारची यावेळी ग्वाही दिली. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेब यांच्यासोबत, तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी वाटपावर देखील तसेच इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाली.




Post a Comment