Header Ads Widget

 


करमाळा-
        6 एप्रिल रोजी होणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी करमाळा शहरातील, श्रीराम मंदिर ट्रस्ट व श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने श्रीराम चौक येथे मुख्य उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी देखील उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात श्रीराम मंदिर वेताळ पेठ व श्रीराम चौक येथे विविध कार्यक्रम घेऊन उत्सव साजरा केला जाणार आहे. हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी, श्रीराम मंदिर ट्रस्ट व उत्सव समितीच्या वतीने श्रीराम चौक येथील उत्सव समितीमध्ये आकाश चिवटे, चेतन ढाले, मनोज कुलकर्णी व कृष्णा फुटाणे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शोभा यात्रा समितीमध्ये निखिल चांदगुडे, दुर्गेश राठोड, विनोद महानवर आणि धनंजय हलवाई यांची निवड करण्यात आली आहे.

         निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे मंदिर विश्वस्त कडून अभिनंदन करण्यात आले. तर या उत्सवासाठी शहर व तालुक्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन श्रीराम मंदिर ट्रस्ट आणि उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment