दिनांक १७ मार्च २०२५ रोजी नागपूर येथे जिहादी मानसिकतेच्या गुंडांनी पोलिसांवर दगडफेक केली. तलवार व कुन्हाडीने हल्ला केला. यामध्ये अनेक पोलीस गंभीर जखमी झालेले असून, यामध्ये महिला पोलिसांचा देखील समावेश आहे. याचबरोबर उपायुक्त स्तराचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील गभीर जखमी आहेत. या निंदनीय प्रकाराचा हिंदू समाज तीव्र निषेध करतो. खाकीवर हात टाकणाऱ्या या जिहादी समाजकंटकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून पुन्हा कोणीही असे धाडस करणार नाही. या प्रसंगी महाराष्ट्र पोलीस दलाच्या पाठीशी सकल हिंदू समाज ठामपणे उभा आहे. संविधान व कायदा सुव्यवस्था वारंवार पायदळी तुडवणाऱ्या जिहाद्यांना या देशाचा कायदा मान्य करावाच लागेल!
हिंदू समाज देखील आदोलन करतो, आपल्या मागण्या मांडतो, हिंदूच्या देखील भावना तीव्र असतात. पण हिंदू समाज कधीही कायदा हातात घेत नाही. संविधानाच्या चौकटीत राहून आपले म्हणणे मांडतो. आपल्या वर्तणुकीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देत नाही. कारण हा सभ्य व कायद्याचा आदर असणारा समाज आहे. याची वेळोवेळी प्रचिती आपणास आलेली असेलच. महोदय, या धर्मांध झुंडशाहीच्या वृत्तीला आळा घालण्याकरिता आपण आपल्या भागातील बागलादेशी व रोहिंग्या घुसखोर, अवैध व्यवसाय, लव्ह जिहाद चे षडयंत्र चालवणाऱ्या शक्ती, लैंड जिहाद च्या माध्यमातून सार्वजनीक जमिनींवर मजारी व थडगी उभी करून जमीन बळकावणारे गुंड, नागरिकांना हैराण करणारे बेकायदेशीर भोंगे यांचेवर कडक कारवाई करावी. जेणेकरून आपल्या भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहील व कायद्याचा सन्मान करणारा, भारत भूमीला माता मानणारा हिंदू नागरीक सुरक्षित व सन्मानाने जगू शकेल. कोणत्या ही दबावाला बळी न पडता अश्या प्रकारच्या धर्मांध शक्तींच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीस अधिका-यांच्या पाठीशी हा हिंदू समाज पूर्ण शक्तीनिशी उभा राहील या बाबत आपण निःशंक राहावे.
अशा प्रकारचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने करमाळा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना देण्यात आले आहे. यावेळी शशिकांत पवार, जितेश कटारिया, संतोष कांबळे, संजय घोरपडे, करण आलाट, वनराज घोलप, गणेश पवार, निलेश परदेशी, दिनेश पवार, शंभुराजे जगताप, प्रशांत पवार, धनराज हलवाई इ. जण उपस्थित होते.





Post a Comment