जिनियस प्रो-एक्टीव्ह अबॅकस क्लासेस जेऊर येथील विद्यार्थ्यांनी, प्रोऐक्टीव्ह अबॅकस नॅशनल 2024-25 स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत, मोठे यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची एक थाप मिळावी. यासाठी जिनियस प्रो-एक्टीव्ह अबॅकस क्लासेस जेऊरच्या वतीने करमाळ्यातील यशकल्याणी सेवाभवन येथे विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
तरी या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन गणेश करे-पाटील (यशकल्याणी सेवाभावी संस्था, करमाळा संस्थापक अध्यक्ष) हे असणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीत मनोज राऊत (उपमुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव), डाॅ. निलेश मोटे (सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ), सिद्धार्थ वाघमारे (संपादक- संघर्ष न्यूज सोलापूर), सौ. डाॅ. स्वाती बिले (संस्थापिका GBPS स्कूल झरे), सौ. वंदना पांडव (केंद्रप्रमुख चिखलठाण), सौ. राजकुंवर पाटील (फार्मासिस्ट), ॲड. सविता शिंदे इ. प्रमुख मान्यवर या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्यासाठी तालुक्यातील विविध ठिकाणच्या पालकांनी उपस्थित रहावे. अशाप्रकारचे कार्यक्रमाचे निमंत्रण जिनियस अबॅकस सेंटरच्या संचालिका कु. अंकिता विष्णु वेदपाठक यांनी दिले आहे. तरी सदरचा कार्यक्रम 22 मार्च रोजी सायं. ठिक 5 वा आयोजित करण्यात आला आहे.




Post a Comment