Header Ads Widget

 


करमाळा-
        दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षेमध्ये, (NMMS परीक्षेत) रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालय चिखलठाण चे तब्बल सोळा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सदर परीक्षा ही एकूण 180 गुणांची झाली. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. ज्ञानेश्वरी विलास सरडे (११३ गुण), महेंद्र जयराम गुंजाळ (११२गुण), कु.पूजा बापूसाहेब ढवळे(१०३गुण), संकेत बंडू कामटे (९९ गुण), महेश शशिकांत राऊत (९८ गुण), शंभुराजे नागनाथ जगताप (८९ गुण), कु. कांचन कालिदास गहिरे (८८ गुण), गौरी लक्ष्मण सरडे (८७ गुण), श्रेयश सुभाष वीर (८६ गुण), कु.विशाखा राजेंद्र कवितके (८२ गुण), कु.अनुष्का गोविंद जाडकर (८१ गुण), कु. श्रेया तुकाराम गलांडे (७५ गुण), कु. प्रतीक्षा जयवर्धन सरडे (७५ गुण), कु.समीक्षा प्रीतीराज सरडे (७३ गुण), निलेश नागनाथ बोराडे (७३ गुण) आणि रुद्र रणजीत टिंगरे (७२ गुण) वरील विद्यार्थ्यांनीं या परीक्षेमध्ये यश मिळवले. 

          या परीक्षेमधून जे विद्यार्थी NMMS शिष्यवृत्तीधारक होतात, त्यांना नववी ते बारावी अखेर प्रतिवर्षी 12 हजार रुपये प्रमाणे चार वर्षात एकूण 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि जे विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती (सारथी शिष्यवृत्ती) साठी पात्र ठरणार आहेत. अशा विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 9600 रुपये प्रमाणे चार वर्षात 38 हजार 400 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या परीक्षेसाठी NMMS विभागाचे विभाग प्रमुख भोई बी.टी.सर, मुंडे सर, भोसले एल.पी.सर, शेंडगे सर, जाधव सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे मुख्याध्यापक वायदंडे सर, रयत शिक्षण संस्थेचे सर्व अधिकारी व पदाधिकारी तसेच स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, चिखलठाण गावातील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व पालक स्तरातून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.



Post a Comment