भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) द्वारे आयोजित शैक्षणिक कार्यक्रमांसाठी, दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाची निवड झालेली असून ग्रामीण भागातील हे पहिलेच सेंटर आहे. या कार्यक्रमांतर्गत ३ महिने, २ महिने, १ महिना आणि ६ दिवस असे विविध कालावधीचे अभ्यासक्रम विद्यार्थी तसेच प्राध्यापकांसाठी ही राबवले जातील. या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केल्यानंतर महाविद्यालयास तसेच सहभागी विद्यार्थ्यास शासकीय प्रमाणपत्र प्राप्त होईल.
विशेष म्हणजे या उपक्रमाचा भाग असल्याने पुढील १ ते २ वर्षांत विद्यार्थ्यांना मोफत ISRO केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे. हा अभिमानास्पद क्षण असून विद्यार्थ्यांसाठी संशोधन व अंतराळ क्षेत्रात नवी दारे उघडणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा रामदास झोळ यांनी व्यक्त केले. या कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्याना अभ्यासक्रमास पूरक सर्टिफिकेट्स मिळून, प्लेसमेंट करीत मदत होऊ शकते त्यामुळे जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्राचार्य डॉ.एस. ए. पाटील यांनी केले आहे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. श्रीकांत साळुंके तसेे चनोडल अधिकारी म्हणून प्रा. तनुजा ढगे हे काम पहात आहेत.





Post a Comment