Header Ads Widget

 


करमाळा- 
             ज्ञानप्राप्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने कुंभारगाव येथे ‘क्लॉथ फॉर वर्क’ या संकल्पनेखाली विशेष उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सोनाली कांबळे व उपाध्यक्ष आनंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिला, पुरुष तसेच ऊसतोड कामगारांनी ही उत्स्फूर्त सहभाग घेत तीन दिवस श्रमदान केले. या श्रमदानाच्या मोबदल्यात १३५ कुटुंबांना जीवनावश्यक कीट वाटप करण्यात आले. गावची स्वच्छता व विकासासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात, ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनिता रामदास पोळ, उपसरपंच सारिका दत्तात्रय भालेराव, अपंग संघटना अध्यक्ष जाफरभाई इनामदार आणि उपाध्यक्ष चिमाजी पानसरे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांनी मीटिंगपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत उत्कृष्ट व्यवस्थापन केले. 

      आम्हाला शेतकरी बचत गटामधील सदस्यांचे कौतुक करावेसे वाटते. ते आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी गावामध्ये श्रमदान, स्वच्छता करतात. त्यांचा सर्व गावकऱ्यांनी आदर्श घेवून गाव स्वच्छ ठेवून गावाचा विकास करावा. ऊसतोड कामगारांनी देखील श्रमदानात सक्रिय सहभाग घेतला, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. या उपक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये श्रमदानाची संस्कृती रुजवण्याबरोबरच, गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा आधार मिळाला. भविष्यात ही ज्ञानप्राप्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था समाजोपयोगी उपक्रम राबवत राहील.

अध्यक्षा सोनाली कांबळे, अध्यक्षा, ज्ञानप्राप्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था



Post a Comment