कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त दि.१९ फेब्रुवारी रोजी, करमाळा तालुक्यातील खडकेवाडी येथील छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परंतू यावर्षी सामाजिक उपक्रम म्हणून मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या रक्तदान शिबिरास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ११ वाजेपर्यंत ४० रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला होता.
तसेच दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष जाबुवंत शेळके व उपाध्यक्ष गणेश पवार यांनी दिली आहे.




Post a Comment