शिवजयंती उत्सव समिती करमाळा शहर व तालुक्याच्या वतीने 395 व्या शिवजयंतीची तयारी अतिशय चांगल्या प्रकारे सुरु झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून करमाळा येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले आहे. यामध्ये 18 तारखेच्या मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतिशबाजी करून, छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करून 19 फेब्रुवारी च्या दिवसाची सुरुवात केली जाणार आहे. सकाळी 7 वा. दुग्धाभिषेक करून सकाळी आयोजित विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे. यामध्ये करमाळा शहरातील प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज, तसेच ग्रामीण भागातील जि. प. प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज मधील शिक्षक- विद्यार्थी यांच्या माध्यमातून लेझीम नृत्य, टीपऱ्या नृत्य, ग्रुप डान्स व सामाजिक संदेश देणारे पथनाट्य सादर केले जाणार आहे.
तसेच महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे. या उद्देशाने समाजातील वक्ते, विचारवंत, वाचकवर्ग यांची भाषणे ही घेतली जाणार आहेत. त्याचप्रमाणे करमाळा शहरातील व ग्रामीण भागातील लेझीम संघ विशेष सहभाग नोंदविणार आहेत. यामध्ये मल्लखांब, मर्दानी खेळ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेलेले आहे. शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे हि आयोजन केले गेले आहे. रक्तदान शिबीर सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार आहे.
शिवजयंती उत्सव समिती करमाळा शहर व तालुक्याच्या वतीने 395 व्या जयंती निमित्त 19 फेब्रुवारी वार-बुधवार रोजी सायंकाळी 4 वा. किल्ला वेस महादेव मंदिर येथून भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे. यावेळी उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून, सदरची मिरवणूक निघणार आहे. यामध्ये स्वरूप जय गणेश डीजे साऊंड व लाईट पुणे, नागनाथ लेझीम संघ शेटफळ, चाऊस बँड वैजापूर, सुजित बँड वाशी, अमर बँड बारामती, रज्जाक भाई बँड करमाळा, झंकार बँड करमाळा, भाई-भाई बँड करमाळा, दोस्ती बँड करमाळा, अनिकेत फोटोग्राफी, एस. के. लीड वाल व CO2 पेपर ब्लास्टर तसेच घोडे व उंट हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असणार आहे. शिवजयंती उत्सव समिती करमाळा च्या वतीने करमाळा शहर व तालुक्यातील सर्वच शिवभक्त बांधवांनी, उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





Post a Comment