यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाजीराव माने (संस्थापक फिनिक्स सायन्स अँकॅडमी, बारामती), प्रा.के. कृष्णमूर्ती (प्राचार्य लॉ कॉलेज धाराशिव), विकास काळे (केंद्रप्रमुख केत्तुर) याबरोबरच सरपंच सचिन वेळेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष निकम, उदयसिंह मोरे पाटील, राजाराम माने, हरिश्चंद्र खाटमोडे, राजेश कानतोडे, सुभाष जरांडे, सर्जेराव राऊत, निर्भया पथकाचे समीर खैरे आदिजन उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. प्रशालेचे पर्यवेक्षक भीमराव बुरुटे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राधिका देशमुख, रोशनी भोसले, वर्षाराणी बाबर या विद्यार्थिनींनी शाळेतील आठवणींना उजाळा देत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
प्रा.धस यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व परिसरातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य काशिनाथ जाधव यांनी केले. सूत्रसंचालन किशोर जाधवर यांनी केले, तर शेवटी आभार रामचंद्र मदने यांनी मानले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मिस्टान्न भोजन देण्यात आले.





Post a Comment