Header Ads Widget

 


करमाळा-
         करमाळा तालुक्यातील फक्त दोन हॉस्पिटल महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट असून, पुढील काळात किमान दहा ते पंधरा हॉस्पिटल या योजनेत समाविष्ट करू, असे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिले. यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी आरोग्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. यावेळी सोशल मीडिया संघटनेचे राज्याचे सचिव सतीश सावंत, सांगोला तालुका समन्वयक निलेशशेठ राठोड, विनोद महानवर, बाबा तोरणे, दीपक पाटणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

         करमाळा तालुक्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेत हॉस्पिटल नसल्यामुळे, सर्वसामान्य रुग्णांना कार्ड असून सुद्धा मोफत उपचार मिळत नाहीत. या योजनेमार्फत पाच लाखापर्यंत उपचार मोफत मिळतात व सर्व प्रकारचे ऑपरेशन होतात. मात्र करमाळ्यात ही योजना उपलब्ध असलेले हॉस्पिटल नाहीत. यामुळे अनेक रुग्णांना हॉस्पिटलला भरमसाठ पैसे भरावे लागतात. यासंदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर म्हणाले की, ज्या हॉस्पिटलचे प्रस्ताव येतील त्यांना तात्काळ मंजुरी देऊ, व करमाळा नो कॅश काऊंटर हॉस्पिटल चालू करण्यासाठी, स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल ला सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्‍वासन त्यांनी दिले. येत्या 7 मार्चला करमाळ्यात महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार असून, या शिबिराच्या उद्घाटनाला आपण उपस्थित राहू. असे आश्वासन आरोग्यमंत्री अबिटकर यांनी दिले.



Post a Comment