Header Ads Widget

 


करमाळा-
            श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त, सरपंच वेणूबाई संतोष पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आले. यावेळी श्रीदेवीचा माळ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन चोरमले, उपसरपंच सचिन शिंदे, ग्रा.पं. सदस्य, माजी सरपंच, ग्रामसेवक दत्तात्रय जाधव, सिद्धेश्वर सोरटे, जयराम सोरटे, प्रभाकर सोरटे, अमोल चव्हाण, महेश सोरटे, प्रभाकर फलफले आदी मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणासाठी श्रीदेवीचा माळ गावातील सर्व नागरिक, ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.



Post a Comment