Header Ads Widget

 


करमाळा- (सिद्धार्थ वाघमारे)
           प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी रोजी देवळाली ग्रामपंचायतीच्या वतीने गावच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून विविध शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायती समोर सरपंच सौ. अश्विनी धनंजय शिंदे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या समवेत ग्रामपंचायतीच्या वतीने, दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून दलित वस्तीतील अभ्यासिकेत 10 स्टडी टेबलचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे 15 व्या वित्त आयोगातुन गावातील आंगणवाडी तसेच शाळेसाठी सरपंच सौ. अश्विनी धनंजय शिंदे यांच्या हस्ते वॉटर फिल्टर मशीन, शालेय कपाट, टेबल, खुर्च्या, धान्य कोठ्या, भांड्यांचे रॅक, सेंटेक्स टाक्या अशा विविध वस्तूंचे वाटप उपस्थित ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

         यावेळी सदरच्या कार्यक्रमासाठी सरपंच सौ. शिंदे यांच्यासह उपसरपंच मंदाकिनी कानगुडे, माजी सरपंच आशिष गायकवाड, माजी सरपंच गहिनीनाथ गणेशकर, ग्रामविकास अधिकारी श्रीधर नागरसे, धनंजय शिंदे, राजेंद्र शिंदे, सुनील ढेरे, पत्रकार प्रफुल्ल दामोदरे, नितीन दामोदरे, महावीर शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी, मुख्याध्यापक सर्व शिक्षक तसेच वरिष्ठ मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment