नोबल इंग्लिश मीडियम स्कूल येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेतील ध्वजारोहणासाठी आजी-माजी सैनिक कल्याणकारी संघटना करमाळा तालुका अध्यक्ष मेजर अक्रूर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या अंजली श्रीवास्तव मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी शाळेतील ध्वजारोहण मेजर अक्रूर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन प्रोत्साहित करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुण्या लेखिका अंजली श्रीवास्तव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बहूमोल मार्गदर्शन केले. व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी फॅन भेट दिला. तसेच मेजर अक्रुर शिंदे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य भेट दिले. सदरच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचा विद्यार्थी सार्थक करंडे व अमन शिकलकर यांनी केले. प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका रजनी साळुंके मॅडम यांनी केले.
सदरच्या प्रजासत्ताकदिनी शाळेतील विद्यार्थ्यांनी बहारदार अशी भाषणे केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पृथ्वीराज नाळे या विद्यार्थ्याने केले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन संस्थापिका आसादे मॅडम यांच्या सूचनेनूसार, मुख्याध्यापिका शितल वाघमारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापिका रजनी साळुंके मॅडम, रोहिणी बेद्रे मॅडम, रजिया मोमीन मॅडम, सोनाली गाडे मॅडम, कबीर सर, वैष्णवी कुलकर्णी मॅडम, सविता माने मॅडम, सुनंदा उकांडे मॅडम यांनी परिश्रम घेतले.




Post a Comment