भाजपाचा स्वतःला सर्वात मोठा नेता समजणारे, देशाचा गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल विचार मांडत असताना, अचानक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करून, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने संपुर्ण देशात संतापाची लाट उसळली. बेजबाबदारपणे वक्तव्य करणाऱ्या अमित शहानी आपल्या गृहमंत्री पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. अन्यथा.... या देशातील फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे पाईक, आणि भीमसैनिक रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी आंदोलने करतील. हे लक्षात घेऊन अमित शहा यांनी माफी मागून राजीनामा द्यावा. असे भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांनी माध्यमांशी बोलताना इशारा दिलेला आहे.
अमित शहा यांचा पूर्वीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असणारा तिरस्कार हा आपोआपच बोलताना पोटातून बाहेर निघालेला आहे. या देशामध्ये शांतता राखण्यासाठी, त्याचप्रमाणे देशातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये. यासाठी आपण जनतेची माफी मागून देशातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा महाराष्ट्रातील जनता आपण केलेल्या विधानाचा चांगला समाचार घेऊन आंदोलन करेल. हे आपण गांभीर्याने लक्षात घ्यावे, असे भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांनी बोलताना सांगितले....




Post a Comment