करमाळा- (सिद्धार्थ वाघमारे)
नामदेवराव भालशंकर गौरव समिती सोलापूर यांच्या वतीने दरवर्षी समाजातील नामवंत, गुणवंत, कीर्तिवंत लोकांची निवड करून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. चुंब येथील विद्या विकास बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त आदर्श शिक्षक, युवराज भगवान सांगळे यांची कर्मवीर भाऊराव पाटील जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुरस्काराचे वितरण 25 डिसेंबर रोजी शिवस्मारक सभागृह सोलापूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न् होणार आहे.




Post a Comment