भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीस पदी विनोद महानवर यांची निवड जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जाहीर केली. याबाबत त्यांना नियुक्तीचे पत्र टेंभुर्णी येथे झालेल्या सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळेवेळी देण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार ,माढा तालुकाध्यक्ष योगेश पाटील, संजय घोरपडे, बाळासाहेब कुंभार ,नरेंद्रसिंह ठाकुर, सचिन चव्हाण, जितेश कटारिया, नितीन कांबळे, करमाळा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रेणुका राऊत आधी जण उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत बोलताना म्हणाले की, भाजपा सदस्य नोंदणी बाबत सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी गावोगावी, घरोघरी जाऊन प्रवास करून भाजपाचे सदस्य करावेत. आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या नोंदणीचा निश्चितच आपल्याला फायदा होईल. भाजपाकडे लोक अपेक्षेने पाहत आहेत. निश्चितच मागील सदस्यता नोंदणी प्रमाणे, या हि वेळी विक्रमी नोंदणी जिल्ह्यातून झाल्याशिवाय राहणार नाही. असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी महानवर यांनी भाजपाचे संघटनात्मक काम वाढविण्यासाठी, आपण निश्चितच मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करू असे अभिवचन त्यांना दिले.





Post a Comment