माढा तालुक्यातील काळे वस्ती (बेंबळे) येथील जि. प. प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांकडून आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस भैय्यासाहेब पाटील ओमराजे कन्ट्रक्शन पिंपळखुंटे यांच्या हस्ते शुभहस्ते अर्पण करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या बाल आनंद बाजारामध्ये 26 प्रकारचे वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये ताजा भाजीपाला, फळे, स्टेशनरी, विविध खाद्यपदार्थ यांचा समावेश होता. या आनंद बाजारामधून विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान प्राप्त व्हावे. यासाठी सदरचा आनंद बाजार भरविण्यात आला होता. यासंदर्भात जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका एम. एल. चोले यांनी माहिती दिली. यावेळी काळे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या बाल आनंद बाजाराला गावातील नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
काळे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका एम एल चोले सह सर्व शिक्षक स्टाप, अंगणवाडी ताई अलका डोळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माणिक काळे, संजय पवार, समाधान पवार, विष्णू काळे, समाधान भोसले, बाळासाहेब काळे, लक्ष्मण काळे, भाऊ काळे, नवनाथ काळे, नागेश पवार, हनुमंत कदम, विठ्ठल काळे, विशाल भोसले, कांतीलाल काळे, सर्जेराव काळे, कुंडलिक काळे, भाऊसाहेब काळे, तुषार काळे, राजेंद्र माने, बाळू कदम, धनाजी काळे, विजय भोसले, विशाल भोसले, महादेव देवकुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तर श्रीराम भोसले, एम. एल. चोले यांनी प्रस्ताविक केले. व सहशिक्षक एस. जे. शिरसाट यांनी सर्वांचे आभार मानले.





Post a Comment