करमाळा नगरपरिषद शिक्षण मंडळाचा सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षातील क्रीडा महोत्सव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेच्या भव्य क्रीडांगणावर उत्साहात पार पडला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सचिन तपसे व शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस चाललेल्या, या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत शहरातील सर्व प्राथमिक शाळांनी उस्फुर्त सहभाग घेतला. क्रीडा स्पर्धेत सांघिक खेळ प्रकारात लंगडी, कबड्डी (लहान गट व मोठा गट) तर वैयक्तिक खेळ प्रकारात धावणे, तीन पायाची शर्यत, लिंबू चमचा, संगीत खुर्ची (लहान गट व मोठा गट) हे खेळ प्रकार घेण्यात आले. सांघिक खेळात 625 व वैयक्तिक खेळात 360 बाल विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग घेतला.
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांनी केले. स्पर्धेची सुरुवात उपस्थित मान्यवरांना मानवंदना देऊन झाली. क्रीडा स्पर्धेत कै.साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नं.1 या शाळेने नेत्रदीपक व शिस्तबद्ध संचलन करून, प्रथम क्रमांक मिळवून या ही वर्षी यशाची परंपरा कायम राखली. तसेच सांघिक सामने प्रकारात लंगडी खेळात (लहान गट) प्रतिस्पर्धी संघाचा एक डाव व 5 गुण राखून प्रथम विजयी संघाची घोडदौड केली, तर लंगडीच्या मोठ्या गटात अटीतटीच्या सामन्यात शाळेचा संघ उपविजेता ठरला. वैयक्तिक क्रीडा सामन्यात शाळेची 1) भारती सावंत - 50 मी धावणे (लहान गट ) - तृतीय क्रमांक, 2)ओवी माहुले - संगीत खुर्ची (मोठा गट) - उत्तेजनार्थ, 3)मिरम तांबोळी - लिंबू चमचा (लहान गट)- उत्तेजनार्थ 4) आलिया शेख - 100 मी धावणे (मोठा गट)- उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले. या सर्व विद्यार्थिनींना मुख्याध्यापक दयानंद चौधरी सर, क्रीडा शिक्षक रमेश नामदे सर, भालचंद्र निमगिरे सर, निलेश धर्माधिकारी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या क्रीडा स्पर्धा कार्यक्रमास नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाच्या स्थापत्य अभियंता अश्विनी जाधव मॅडम, पाणी पुरवठा अभियंता शितल बहाड मॅडम, केंद्र समन्व्यक दयानंद चौधरी सर, वरिष्ठ लिपिक शिवदास कोकाटे, निखिल पायघन हे मान्यवर उपस्थित होते. क्रीडा स्पर्धेस पंच म्हणून यशवंत गपाट सर, ज्ञानेश्वर खुने सर, बाळासाहेब ढेंबरे सर, परसराम गाढवे सर लाभले. या सर्वांनी उत्कृष्टपणे पंचांची भूमिका बजावली.
सर्व यशस्वी खेळाडूंचे माजी आमदार मा.जयवंतरावजी जगताप साहेब,माजी नगराध्यक्ष मा.वैभवराजे जगताप साहेब,मुख्याधिकारी मा. सचिन तपसे साहेब, प्रशासन अधिकारी मा. अनिल बनसोडे साहेब, मुख्याध्यापक तथा केंद्र समन्वयक मा.दयानंद चौधरी सर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मा.सौ.निर्मला फंड,उपअध्यक्षा सौ.आम्रपाली कांबळे, शिक्षण तज्ञ सदस्या सौ. माधुरी पवार सर्व सदस्य व पालक यांनी अभिनंदन केले.
क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी तयारीसाठी सौ.सुनिता क्षिरसागर मॅडम,सौ.सुवर्णा वेळापुरे मॅडम,सौ.मोनिका चौधरी मॅडम,श्रीम.तृप्ती बेडकुते मॅडम,श्रीम.भाग्यश्री पिसे मॅडम,श्रीम.संध्या शिंदे मॅडम यांनी परिश्रम घेतले.






Post a Comment