Header Ads Widget

 


करमाळा- 
         तालुक्यातील पोथरे येथे शनिवारी (२ नोव्हेंबर) पहाटे ४ वाजता 'स्वरदीप दिवाळी पहाट' हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सदरच्या कार्यक्रमाचे पोथरे ग्रामस्थांच्या वतीने शनी मंदिर येथे होणार असून, याच्या श्रवणाचा लाभ रसिक श्रोत्यानी घ्यावा, असे आवाहन पार्श्वगायक संदीप पाटील यांनी केले आहे.
             संदीप पाटील प्रस्तुत भव्य 'संगीतमय पहाट' ही भावगीत, भक्तीगीत, चित्रपट गीतांची दर्जेदार मैफिल राज्यातील प्रसिद्ध वादकांच्या साथीने होणार आहे. पहाटे ४ वाजता ऐतिहासिक २१२१ दिव्यांचा भव्य दीपोत्सव सोहळा ही यावेळी होणार आहे. गायिका रोहिणी मॅडम, निवेदक रियाज पठाण, गायक कृष्णा जाधव, संगीत संयोजक अंबरीश जहागीरदार, पॅड व मशीन वादक गौतम गुजर, ढोलकी वादक अंकित करारे हे कला सादर करणार आहेत.

           स्वरदिप दिवाळी पहाट या कार्यक्रमासाठी तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील व सुनील कदम हे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे उपस्थित महिलांसाठी 'खेळ पैठणीचा' हा कार्यक्रम होणार असून, पाच विजेत्या महिलांना 'मानाची पैठणी' दिली जाणार आहे, असे पाटील यांनी माहिती दिली आहे.


Post a Comment