करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
करमाळा शहरातील बऱ्याच दिवसापासुन प्रलंबित असणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी वारंवार नगरपालिकेचे मुख्याधिकारी व आ. संजयमामा शिंदे यांना पत्राद्वारे नगरपालिकेतील पाण्याची मोटार खराब असल्याबाबत, आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा. करमाळा शहरासाठी उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाई ही निसर्ग निर्मित होती. परंतु उजनी 100% भरून देखील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करमाळा नगरपालिकेत महिलांसह निवेदन दिले होते. याची दखल घेत आ. संजयमामा शिंदे यांनी दहिगाव येथील पिण्याच्या पाण्याच्या मोटारीसाठी 1 कोटी 40 लाख निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान करमाळा व व्यापारी मित्रांसह शहरातील सुरक्षेच्या प्रश्नासाठी प्रमुख चौकात, बायपास, शाळा परिसरात जवळपास 300 CCTV कॅमेरे बसवण्याची मागणी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष घोलप यांच्यासह व्यापारी मित्रांनी पत्राद्वारे केली होती. या सुद्धा मागणीचा विचार करुन 30 लाख रु. निधी आमदार फंडातून तात्काळ उपलब्ध करून दिला आहे. याबद्दल आ. संजयमामा शिंदे यांचे सर्वांनी आभार मानले आहेत.






Post a Comment