Header Ads Widget

 


करमाळा-
        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीनुसार पोथरे, करंजे, मांगी या भागातील दळणवळणाचे रस्ते मजबूत करण्यासाठी 80 लाख निधी मंजूर झाला असून, त्याची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे. धायखिंडी ते करंजे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 30 लाख रुपये मंजूर झाले असून डांबरीकरण करण्यात येणार आहे. बोरगाव ते दिलमेश्वर रस्ता डांबरीकरण करणे. यासाठी ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मांगी, पोथरे, निलज या अंतर्गत रस्ता मजबूत करण्यासाठी 25 लाख रुपये मंजूर झाले आहेत. 
         याबाबत बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील विविध विकास कामासाठी गेल्या अडीच वर्षात शिवसेनेच्या माध्यमातून, जवळपास 35 कोटी रुपयांचा निधी आणला आहे. याशिवाय करमाळा MIDC मध्ये रस्ते व पाणीपुरवठा करणे. यासाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचे टेंडर झाले आहे. करमाळा नगरपालिकेतील भुयारी गटारी योजना व अमृत जल-२ ही 200 कोटी रुपयांची योजना शासनाकडे प्रलंबित असून, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना तात्काळ अंमलात आणणार आहे. करमाळा नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत व नाट्यगृह, यासाठी 15 कोटी रुपयांची टेंडर झाले असुन हे काम सुद्धा लवकरच सुरू होईल.

        तालुक्याचे विकासात एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे योगदान दिले असून, येणाऱ्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी धनुष्यबाणालाच मतदान करावे. असे आवाहन उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील यांनी केले आहे.



Post a Comment